या शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी,येथे चेक करा August 3, 2026 by Marathi महाराष्ट्रात शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा: उद्या खात्यात ७ हजार कोटी जमा होणार; ९४ हजार करदाते शेतकरी अपात्र Loan waiver reject list राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेचा लाभ मिळणाऱ्या उर्वरित १६ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात उद्या (मंगळवार, ४ ऑगस्ट) एकाच वेळी ७,००० कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा कर्जमुक्ती योजनेची मुख्य वैशिष्ट्ये व अटी: २ लाखांपर्यंत कर्जमाफी: ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. नियमित परतफेडीवर प्रोत्साहन: कर्ज योजनेची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. २ लाखांवरील कर्जासाठी ‘एकवेळ समझोता’ (OTS): २ लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी २ लाखांवरील उर्वरित रक्कम स्वतः भरल्यास, सरकार त्यांच्या खात्यात उर्वरित २ लाख रुपये जमा करेल. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा ९४ हजार शेतकरी अपात्र: पहिल्या टप्प्यात २ लाखांच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांच्या यादीची प्राप्तिकर (Income Tax) विभागाकडून छाननी करण्यात आली. यात ९४ हजार शेतकरी प्राप्तिकर भरणारे आढळल्याने त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. ई-केवायसी (e-KYC) आवश्यक: उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (Aadhaar authentication) पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यात निधी थेट वर्ग केला जात आहे. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा भंडारा जिल्हा: २२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ एकूण कर्जमाफी रक्कम: भंडारा जिल्ह्यातील २२,३६५ पात्र शेतकऱ्यांना १३७ कोटी १३ लाख ३३ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. प्रमाणीकरण अपडेट: भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र लाभार्थ्यांपैकी ७५% शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. पोर्टलवरील माहिती: जिल्ह्यातील सहकारी, राष्ट्रीयकृत, खासगी आणि ग्रामीण बँकांची मिळून एकूण ३०,५९४ कर्जखाती ‘महाआयटी’च्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा