apply now

अदिती तटकरे यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल सुरू आहेत. यामुळे ई-केवायसी करताना महिलांना अडचणी येत आहेत. विशेषतः ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीत, त्यांच्यासाठी वेबसाईटवर आवश्यक बदल केले जात आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महिलांना ई-केवायसी करणं सोपं होईल. या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळेल,” अशी खात्री तटकरे यांनी दिली आहे.

दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं हे पुढील हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक आहे. ई-केवायसी केल्याशिवाय पुढील हप्ता खात्यात जमा होणार नाही, अशा स्पष्ट सूचना आहेत. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी या मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सरकारची सर्वाधिक लोकप्रिया योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 16 वा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी महिलांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. ई-केवायसी करताना येणाऱ्या अडचणींवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वेबसाईटमध्ये बदल होत असल्याने ई-केवायसीला वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या महिलांचे पती व वडील नाहीत, त्यांच्यासाठी वेबसाईटमध्ये विशेष बदल केले जात असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि कोणतीही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.