Land Documents : जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते येथे पहा?
सातबारा उतारा
जमिनीचा उतारा हा जमिनीचा मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे? त्याचा किती जमिनीवरती अधिकार आहे? हे नमूद केलेलं असतं. यावरून जमिनीचा खरा मालक कोण? त्याची ओळख पटण्यास सुद्धा मदत होते. आता सरकारने डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा देखील उपलब्ध करून दिला आहे.
खाते उतारा किंवा आठ अ
एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. त्यामुळे या सगळ्या गट क्रमांकमधील शेत जमिनीची जी माहिती आहे, ती माहिती एकत्रितपणे खाते उताऱ्यावरती नोंदवलेली असते. आठ अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोण-कोणत्या गटात आहे, त्याची माहिती तुम्हाला कळू शकते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी आठ अ हा महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जातो.
जमीन मोजणीचे नकाशे
जमिनीच्या मालकी हक्क संदर्भात काहीही वाद उद्भवला तर जमिनीचे मोजणी केली जाते. यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्या जवळ असल्यास त्या जमिनीवरील मालकी हक्क हा प्रस्थापित करता येऊ शकतो त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे हे जपून ठेवणं गरजेचं असते. एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावरती आहे आणि त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती या नकाशावर दिलेली असते.