अर्ज प्रक्रिया
या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद येथे जाऊन भेट देऊ शकता. यासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्रात जाऊन योजनेसाठी अर्ज भरू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
- १. या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो?
महाराष्ट्रातील १८ ते ६० वर्ष वयोगटातील महिला, ज्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांच्या आत असावे.
- २. पीठ गिरणी मोफत का मिळते?
सरकार १०० टक्के अनुदान देत आहे, महिलांना स्वतः पैसे मोजावे लागणार नाहीत.
- ३. अर्ज कुठे करावा?
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा CSC केंद्राद्वारे अर्ज करता येईल.
- ४. लाभार्थी निवडीसाठी काय अटी आहेत?
मागील ३ वर्षांत योजनेचा लाभ घेतलेला नसावा, आधारशी लिंक केलेले बँक खाते आवश्यक आहे.
- ५. योजनेमुळे महिलांना काय फायदे होणार?
घरबसल्या उत्पन्न वाढेल, आर्थिक स्वावलंबन मिळेल, रोजगार निर्मिती होईल, व वीज खर्च कमी होईल (सोलर चक्की).